विशेष प्रतिनिधी
ढाका : बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिरावरील हल्ल्याचे प्रकरण समोर आले आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील इस्कॉन राधाकांता मंदिरावर गुरुवारी संध्याकाळी जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात तोडफोड करण्यात आली आणि जमावाने येथे ठेवलेल्या मौल्यवान वस्तूही लुटल्या. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. Attack on Hindu temple once again in Bangladesh
ढाका येथील वारी येथील २२२ लाल मोहन साहा स्ट्रीटवर असलेल्या इस्कॉन राधाकांता मंदिरात संध्याकाळी ७ वाजता हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. हाजी सैफुल्ला यांच्या नेतृत्वाखाली २०० हून अधिक लोकांच्या जमावाने हा हल्ला केला होता. मंदिराची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली. या हल्ल्यात सुमंत्र चंद्र श्रवण, निहार हलदर, राजीव भद्र यांच्यासह अनेक जण जखमी झाले आहेत.
बांगलादेशातील ढाका येथील इस्कॉन राधाकांता मंदिरावरील हल्ल्याबाबत इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले की, हे हल्ले गंभीर चिंतेची बाब आहेत. आम्ही बांगलादेश सरकारला विनंती करतो की कठोर कारवाई करावी आणि देशातील हिंदू अल्पसंख्याकांना सुरक्षा प्रदान करावी.
त्यांनी सांगितले की, काल संध्याकाळी भाविक गौर पौर्णिमा उत्सवाच्या तयारीत असताना ढाका येथील श्री राधाकांता मंदिराच्या आवारात २०० लोकांच्या जमावाने घुसून त्यांच्यावर हल्ला केला, त्यातील ३ जण हाणामारीत जखमी झाले. त्यांनी पोलिसांना पाचारण केले आणि हल्लेखोरांना पळवण्यात यश आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App