MHADA, CIDCO lottery : मुंबईत घराचे स्वप्न होणार साकार; म्हाडा, सिडको कडून एकूण 6500 घरांची लॉटरी!!

प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुढील महिन्यात म्हाडाकडून स्वस्त घरांची बंपर लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाची तब्बल 1200 घरांची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच सिडको कडून 5730 घरांची लॉटरी निघणार आहे. MHADA, CIDCO lottery in mumbai 6500 house

म्हाडाच्या नवीन घरांची लॉटरी लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. म्हाडाकडून पुढील महिन्या स्वस्त घरांची घोषणा होणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 1200 घरांसाठी ही लॉटरी असणार आहे.

म्हाडाची ही घरे ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, विरारमध्ये असणार आहेत. मुंबईत घर असावं असं स्वप्न असणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही लॉटरी स्वप्नांना साकार करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. यासंबधीची माहिती वेळोवेळी म्हाडाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात येईल.

– Cidco ची खूशखबर ! 5730 घरांसाठी निघणार लॉटरी

होळीच्या आधी CIDCO ने सामान्य नागरिकांना खूशखबर दिली आहे. सिडकोतर्फ 5730 सदनिकांच्या महागृहनिर्माण योजना 2022 अंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडमधील अतिरिक्त सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एकूण 6,508 सदनिका विक्रीकरिता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबईमध्ये आपले हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे.

योजनेतील अर्ज नोंदणी ते सोडत या दरम्यानच्या सर्व प्रक्रिया या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. यासाठी तुम्हाला www.lottery.cidcoindia.com या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. अर्जदारांना अर्ज नोंदणी, कागदपत्रे सादर करणे आणि अनामत रकमेचा भरणा करायचा आहे. पण अर्जदारांना ठिकाण (नोड) निवडण्याचा पर्याय उपलब्ध असणार नाही. संगणकीय सोडत काढून वरीलपैकी कोणत्याही ठिकाणी घर उपलब्ध होणार आहे.

MHADA, CIDCO lottery in mumbai 6500 house

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात