विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : युक्रेन रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भारत सरकारची तत्परता पाहून काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा देखील थक्क झाले. त्यांनी संसदेत परराष्ट्र मंत्रालयाचे भरभरून कौतुक केले . माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार आनंद शर्मा यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाने अप्रतिम काम केले. परराष्ट्र मंत्रालयाने केलेले काम सोपे नाही. त्यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव देखील सांगितला.ते म्हणाले रात्री १ वाजता देखील भारत सरकार सक्रिय होते .आणि त्यांनी माझी मदत केली .Congress MP appreciates MODI government: Congress MP Anand Sharma shocked by Operation Ganga! Appreciation in Parliament. Awesome work – Ministry of External Affairs was active even at 1 o’clock at night …
खार्किव आणि सुमी येथून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढणे अत्यंत आव्हानात्मक होते हे परराष्ट्र मंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. “विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना खार्किवमधून कसे तरी बाहेर काढण्यात आले, सुमीमध्येही विद्यार्थी गोळीबारात अडकण्याचा धोका होता. युक्रेनमध्ये अडकलेल्या 20,000 भारतीयांची सुटका करण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ सुरू करण्यात आल्याचे जयशंकर म्हणाले. या मोहिमेत अनेक अडचणी आल्या. परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण ऑपरेशनचे बारकाईने निरीक्षण केले.
काँग्रेसने भाताच्या प्रयत्नांचे कौतुक केले
काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानाने सुरू झालेल्या चर्चेत भाग घेताना केंद्र सरकारचे कौतुक केले. परदेशातील भारतीय दूतावासाने केलेले काम सोपे नाही, असे ते म्हणाले. शर्मा म्हणाले, ‘मलाही अनेक विनंत्या आल्या. युक्रेन मधून मित्र आणि नातलगांना वाचवण्यासाठी ..मी एकदा रात्री 1 वाजता MEA शी संपर्क साधला. मला 1.22 वाजता एका अधिकाऱ्याकडून लगेच उत्तर मिळाले….
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App