वृत्तसंस्था
औरंगाबाद : एकाच दिवशी १०१ ई कार खरेदी करण्याचा विक्रम औरंगाबादकरांनी केला आहे. या पूर्वी ही संख्या ९९ होती. ‘मिशन फाॅर ग्रीन माेबिलिटी’अंतर्गत औरंगाबादेत साेमवारी एकाच दिवशी १०१ इलेक्ट्रिक कार खरेदीचा नवा विक्रम घडला. मराठवाडा ऑटाेक्लस्टरच्या पुढाकारातून प्रदूषणमुक्त वातावरणासाठी ही माेहीम राबवली जात आहे. Purchase of 101 electric cars in a single day, Aurangabadkar’s record; 25 cars were taken by women
मार्चअखेर २५० ई-कार बुकिंगचे उद्दिष्ट ठेवले होते, मात्र १५ मार्चपर्यंतच ३०० कारची बुकिंग झाली. त्यापैकी १०१ कारचे साेमवारी एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये एकाच वेळी वितरणही झाले. विशेष म्हणजे २५ कार महिलांनी घेतल्या आहेत हे विशेष.
आतापर्यंत फक्त ९९ ई-कारची नोंद होती. ती संख्या आता २०० पर्यंत गेली आहे. यापूर्वी औरंगाबादने ऑक्टाेबर २०१० मध्ये एकाच वेळी १५० मर्सिडीझ कार खरेदीचा विक्रम केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App