काश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 1990 मध्ये घडलेल्या काश्मिरी पंडितांची वेदनादायक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार स्टारर या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, जाणून घेऊया.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती लाभली असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. शुक्रवार, ११ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.Danka of The Kashmir Files after Pavankhind! So many crores earned on the first day …
#OneWordReview…#TheKashmirFiles: BRILLIANT.Rating: ⭐️⭐⭐️⭐️½#TheKashmirFiles is the most powerful film on #Kashmir and the genocide and exodus of #KashmiriPandits… Hard-hitting, blunt, brutally honest… JUST DON’T MISS IT. #TheKashmirFilesReview pic.twitter.com/FPnw7OidMK — taran adarsh (@taran_adarsh) March 11, 2022
#OneWordReview…#TheKashmirFiles: BRILLIANT.Rating: ⭐️⭐⭐️⭐️½#TheKashmirFiles is the most powerful film on #Kashmir and the genocide and exodus of #KashmiriPandits… Hard-hitting, blunt, brutally honest… JUST DON’T MISS IT. #TheKashmirFilesReview pic.twitter.com/FPnw7OidMK
— taran adarsh (@taran_adarsh) March 11, 2022
प्रदर्शनाच्या दिवशीच या चित्रपटाने तब्बल साडे चार कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटासाठी हे खूपच मोठे यश मानले जात आहे.
https://youtu.be/YDVpHcLGni8
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, काश्मीर फाइल्स 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर आधारित आहे. भारताच्या इतिहासातील ही एक अत्यंत क्लेशदायक घटना आहे, जी काश्मिरी आणि इतर भारतीयांच्या मनात अनेक दशकांपर्यंत राहील.
द काश्मीर फाईल्स या चित्रपटातून विवेक अग्निहोत्री यांनी ९० च्या दशकात झालेल्या काश्मिरी पंडितांच्या शिरकांडाचे वास्तव मांडले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, पुनीत इस्सार यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
काश्मीर फाइल्स भारतात 561 सिनेमागृहात, 113 परदेशातील स्क्रीन्समध्ये रिलीज झाली. ही संख्या इतर बिग बजेट चित्रपटांपेक्षा कमी आहे. मात्र असे असतानाही चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई आश्चर्यकारक आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App