विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जो पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला टाकले सगळे रेकॉर्डिंग हे सरकारी केंद्रीय तपास यंत्रणांच्या हस्तक्षेपाशिवाय होणे शक्य नाही. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर बोट ठेवले होते. मात्र, आज चार दिवसांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी “अचानक” प्रकट होऊन शरद पवार यांचे ते आरोप अप्रत्यक्षपणे फेटाळून लावले आहेत. Fadanavis pendrive Bomb: Public Prosecutor Praveen Chavan refutes Sharad Pawar’s allegations against Central Investigation Agency !!; How to read it !!
सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातले व्हिडिओ रेकॉर्डिंग देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह मध्ये आहे. संबंधित रेकॉर्डिंग हे जळगाव मधील एक आरोपी तेजस मोरे याने भिंतीवरच्या घड्याळात छुपा कॅमेरा बसवून केले होते, असा खळबळजनक दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे. इतकेच नाही तर आरोपी तेजस मोरे याला तुरुंगात असलेल्या इतर आरोपींची देखील साथ असल्याचा दावाही प्रवीण चव्हाण यांनी केला आहे. या आरोपींच्या केसेस प्रवीण चव्हाण सरकारी वकील म्हणून लढवत आहेत. त्या आरोपींनी स्टींग ऑपरेशनमध्ये तेजस मोरेला साथ दिल्याचा दावा प्रवीण चव्हाण यांनी एबीपी माझाला दिलेल्या सुपर एक्सक्लूसिव मुलाखतीत केला आहे.
त्यामुळे अर्थातच शरद पवार यांचा केंद्रीय तपास यंत्रणांच्या हस्तक्षेपातून स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा स्वतः सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आज फेटाळल्याचे स्पष्ट झाले आहे. स्टिंग ऑपरेशनच्या या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी देखील प्रवीण त्यांनी केली आहे. भाजपचे माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधात पुरावे आहेत म्हणूनच त्यांच्यावर कारवाई होत आहे असा दावाही प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.
स्टिंग ऑपरेशन करणारा तेजस मोरे हा मूळचा जळगावचा रहिवासी आहे तो आपला आशील आहे आणि त्याने आपल्याला भिंतीवरचे घड्याळ भेट म्हणून दिले होते. त्या घड्याळ यातच छुपा कॅमेरा बसवला होता आणि त्यातून हे शूटिंग करण्यात आले आहे. यामुळे या स्टिंग ऑपरेशन मधले जळगाव कनेक्शन उघड होत आहे, असा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आठ मार्च रोजी विधानसभेत सायंकाळी पेनड्राइव्ह बॉम्ब फोडला. त्या दिवशी सायंकाळी प्रवीण चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ते “गायब” झाले.
दुसऱ्या दिवसापासून अनेक वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण कार्यालयाला कुलूप होते. प्रवीण चव्हाण हे पुण्यामध्ये 1 मोदी बाग जवळ असलेल्या हिरवाई बिल्डिंग मध्ये राहतात. 1 मोदी बाग हे हा शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानाचा पत्ता आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी प्रवीण चव्हाण नेमके कोठे आहेत?, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते 4 दिवस “गायब” राहिले आणि आज “अचानक” त्यांनी एबीपी माझा समोर “प्रकट” होऊन आपली बाजू मांडली.
काश्मिरात जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी ठार खोऱ्यात आज पहाटे पासून चकमक सुरू
निलेश राणे म्हणाले, मराठा अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला पण नवाब मलिकांचा घेतला नाही, म्हणून शरद पवारच दाऊदचा माणूस आहे की काय अशी शंका
Fadanavis pendrive Bomb : “गायब” सरकारी वकील प्रवीण चव्हाण 4 दिवसांनी एबीपी माझा समोर “प्रकट”; रेकॉर्डिंग मॅनिप्युलेशनचा केला दावा!!
माजी क्लास वन ऑफीसर आणि ज्येष्ठ लेखकावर पंढरपुरात मागण्याची वेळ
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App