पंजाब मध्ये आम आदमी पक्षाने अभूतपर्व यश प्राप्त केल्यामुळे आणि गोव्यात पक्षाचे विजयी खाते ऊघडले गेल्याने पुण्यातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
विशेष प्रतिनिधी
पुणे – पंजाब, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकालात आम आदमी पक्षाला पंजाब राज्यात भरघोस यश मिळून एकहाती सत्ता मिळाली. तर गोव्यात पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाल्याने पुण्यातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. Pune Aam Admi Party members celebrate Punjab election victory
गुरवारी सकाळ पासून आम आदमी पक्षाच्या लुंकड व्हिला, लॉ कॉलेज रोड येथील कार्यालयात निवडणूक निकाल स्क्रीनवर लाईव्ह बघण्याची सोय करण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी निवडणूक निकाल पाहण्यासाठी गर्दी करत ज्याप्रकारे पंजाब मध्ये जागा वाढत गेल्या तसा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.
निकाल स्पष्ट झाल्यावर लॉ कॉलेज रोडवरील कार्यालयाजवळ गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी चार वाजता बाईक, रिक्षा रॅली मधून विजयी रॅली काढण्यात आली. लॉ कॉलेज रोड — नळ स्टॉप— म्हात्रे पूल— दांडेकर पूल— सारसबाग —- टिळक रोड —- संभाजी पूल— फर्ग्युसन कॉलेज रोड — शिवाजीनगर — जंगली महाराज रोड — झाशीच्या राणीचा पुतळा या मार्गाने बालगंधर्व रंगमंदिर जवळ झाशीच्या राणीचा पुतळा येथे विजयोत्सव रॅलीचा समारोप करण्यात आल्याची माहिती आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ता डॉ अभिजीत मोरे यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App