विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या 200 विद्यार्थ्यांना घेऊन दुसरे विमान आज सकाळी दिल्लीला पोहोचले. या विद्यार्थ्यांना रोमानियामार्गे विमानाने नेण्यात आले. After the bomb blast, Shekharappa will bring it to earth
दरम्यान, युुक्रेनमधील बॉम्बस्फोट थांबल्यानंतर शेखरप्पा यांचे पार्थिव भारतात आणले जाईल. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सांगितले की, या प्रकरणी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी चर्चा झाली आहे. नवीनचा मृतदेह शवागृहात ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बाॅम्बस्फोट थांबल्यानंतर त्यांचे पार्थिव भारतात आणले जाईल. शेखरप्पा हा वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. रशियन सैन्याने केलेल्या गोळीबारात तो मरण पावला.
आज 12:30 पासून रशियाचा युद्धविराम
भारतातील रशियन दूतावासाने सांगितले की, युक्रेनमधील युद्धग्रस्त भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी आज 12:30 (भारतीय वेळेनुसार) पासून युद्धविराम होणार आहे. या दरम्यान, लोकांना बाहेर काढण्यासाठी एक मानवतावादी कॉरिडॉर बनवला जाईल.
युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशिया सर्वाधिक निर्बंध असलेला देश ठरला आहे. निर्बंधांच्या बाबतीतही रशियाने इराण आणि उत्तर कोरियाला मागे टाकले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियावर आतापर्यंत 2,778 नवीन निर्बंधांसह एकूण 5,530 निर्बंध लादण्यात आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App