Uttar Pradesh Exit Poll 2022 : उत्तर प्रदेशमध्ये जय भाजपा तय भाजपा ! डबल इंजिन सरकार … मोदी-योगी सरकार..

  1. भारतीय जनता पक्ष (भाजप) आघाडीला २८८ ते ३२६ जागा , तर समाजवादी पक्ष आघाडीला ७१ ते १०१ जागा मिळणार.

विशेष प्रतिनिधी

लखनऊ :उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडले आहे. मतदानानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. उत्तर प्रदेशातील या सर्वात मोठ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपाचे सरकार स्थापन होणार असल्याचे आकडे सांगत आहेत .त्यामुळे डबल इंजिन मोदी योगी सरकार सत्तेत कायम राहणार असल्याचे आजचे आकडे सांगताय.Uttar Pradesh Exit Poll 2022: BJP wins in Uttar Pradesh! Double engine government … Modi-Yogi government ..

४०३ सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेमध्ये भाजपच बाजी मारणार असल्याचं प्रमुख एक्झिट पोल्समधून स्पष्ट झालं आहे.

रिपब्लिक टीव्ही आणि न्यूज१८ ओपिनियन पोलने उत्तर प्रदेशात भाजपा सरकारचा अंदाज वर्तवला आहे. एबीपी न्यूजने सी व्होटरसह सर्वेक्षण केले आहे, आज तकने अॅक्सिस माय इंडिया सोबत एक्झिट पोल केला आहे.

रिपब्लिक पी मार्क एक्झिट पोल

रिपब्लिक पी मार्क एक्झिट पोलनुसार भाजपाला पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये बहुमत मिळू शकते. भाजपला २४० जागा मिळण्याची शक्यता आहे. सपाला १४० जागा मिळण्याचा अंदाज आहे. बसपाला पुन्हा एकदा १४ जागांवर समाधान मानावे लागू शकते. भाजपला ४०.१ टक्के जागा मिळू शकतात. सपाला ३४ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. बसपाला १६.३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

न्यूज १८ पोल स्ट्रॅटच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा सरकार

न्यूज१८ पोल स्ट्रॅटनुसार भाजपाला २११ ते २२५ जागा मिळू शकतात. सपाला १४६ ते १६० जागा मिळण्याचा अंदाज आहे. बसपाला १४ ते २४ जागा मिळू शकतात.

टाईम्स नाऊ नवभारत अंदाजानुसार भाजपाला बहुमत

टाईम्स नाऊ नवभारत एक्झिट पोलनुसार भाजपाला २२५ जागा मिळू शकतात. सपा आघाडीच्या १५१ जागा कमी होऊ शकतात. बसपाला १४ जागा मिळाल्या तर काँग्रेसला फक्त ९ जागा मिळू शकतात.

व्हेटो…
भाजपला २२५ जागा
VETO ने भाजप आघाडीला २२५ जागा, तर सपा आघाडीला १५१ जागा दिल्या आहेत. बसपाला १४ तर काँग्रेसला ९ जागा मिळताना दिसत आहेत.

तीन एक्झिट पोलमध्ये ‘ योगी सरकार’

TV9 चा एक्झिट पोलही समोर आला आहे. त्यातही भाजपचे सरकार पुन्हा स्थापन होताना दिसत आहे. भाजप आघाडीला २११ ते २२५ जागा मिळताना दिसत आहेत, तर सपा आघाडीला १४६ ते १६० जागा मिळत आहेत. त्याचवेळी बसपाला १४ ते २४ तर काँग्रेसला ४ते ६ जागा मिळताना दिसत आहेत.

CSEPR एक्झिट पोलमध्येही योगी सरकार

यूपी निवडणुकीसाठी सीएसईपीआरच्या एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला बहुमत मिळताना दिसत आहे. CSEPR ने भाजप आघाडीला २३१ जागा, सपा आघाडीला १५० जागा, बसपाला १२ जागा, काँग्रेसला ६ जागा आणि इतरांना ४ जागा दिल्या आहेत.

Uttar Pradesh Exit Poll 2022: BJP wins in Uttar Pradesh! Double engine government … Modi-Yogi government

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात