गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत (BJP), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Congress), माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (TMC), रवी नाईक (BJP), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
विशेष प्रतिनिधी
पणजी :गोव्यातील 40 विधानसभा जागांवर 301 उमेदवारांनी आपले नशीब आजमावत आहेत. गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं आहे. इथे 78.94 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आता वाट फक्त निकालाची. आज एक्झिट पोल चे आकडे आले त्यानुसार लढत काटे की होणार असली तरीही सत्ता मात्र भाजपकडेच राहणार आहे . Exit Polls 2022: BJP in Goa! Kingmaker will be a small party … what the numbers say …
गोव्यात आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेसची एंट्री झाल्यानं काँग्रेसला फटका बसेल आणि त्याचा फायदा भाजपला होईल.
गोव्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी 21 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे गोव्यात लहान पक्ष किंगमेकर ठरू शकतात.
भाजपला 17 ते 19, काँग्रेसला 11 ते 13, आपला 1 ते 4 आणि इतरांना 1 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
10 मार्च रोजी गोव्यासह पाच राज्यांचा निकाल जाहीर होणार आहे. पण त्याआधी राज्यात कोणाचं सरकार बनणार हे चित्र आजच काहीस स्पष्ट झालं आहे .
एक्झिट पोल म्हणजे जे मतदार मतदान करुन बाहेर येतात. त्यांना मीडिया हाऊस किंवा काही संस्था सर्वेचा भाग म्हणून त्यांचं मतदान कोणाला आहे हे जाणून घेतात. त्यानंतर सर्व उत्तरं एकाच ठिकाणी एकत्रित करून निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तवला जातो.
यावेळी गोव्यात सर्वाधिक 89..61% मतदान साखळी (Sankhali) जागेवर झाले आहे. जिथून भाजपचे उमेदवार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत निवडणूक लढवत आहेत. त्यांनी 2012 आणि 2017 मध्ये दोनदा ही जागा जिंकली आहे.
उत्पल पर्रीकर यांना भाजपकडून तिकीट न मिळाल्याने ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उतरले. या निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App