विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानमार्गे भारतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होते. गुजरात एटीएसने रविवारी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत २,१६० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ७३पाकिस्तानी नागरिकांनाही तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. Drugs worth Rs 2,160 crore seized in three years
एटीएसने दावा केला आहे की पाकिस्तानी तस्करांनी गुजरात किनारपट्टीचा वापर करून अमली पदार्थांची तस्करी करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु असे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात आले.
२०२१ मध्ये १,४६६.१८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. गुजरात एटीएसने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, २०२१ मध्ये केवळ १,४६६.१८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तर गेल्या दोन वर्षांत ७०४.४ कोटी रुपयांचे नशिले पदार्थ, औषधे जप्त करण्यात आली होती.
या आकडेवारीत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून २१,००० कोटी रुपयांच्या ड्रग्ज जप्तीचा समावेश नाही. या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहे.
रिलीझमध्ये म्हटले आहे की, २०१९-२०२१ दरम्यान, राज्य एटीएसने ४२७.३ किलो हेरॉइन,६.६५ किलो एमडी आणि ३.५४ किलो ब्राऊन शुगर जप्त केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App