अमेठीतील मतदारांवर प्रियांका गांधी संतापल्या; डोळे झाकून मतदान करून तुम्ही पस्तावता!!, म्हणाल्या

वृत्तसंस्था

अमेठी : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज अमेठीतल्या मतदारांवर चांगल्याच संतापलेल्या दिसल्या. तुम्ही मतदान करताना विचार करत नाही. कोणाच्याही आश्वासनावर भरकटत जाता. डोळे झाकून आंधळेपणाने मतदान करता आणि मग पस्तावत बसता, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी अमेठीतल्या मतदारांचे अक्षरश: वाभाडे काढले.Priyanka Gandhi angry with Amethi voters; You repent by voting with your eyes closed !!, she said

प्रियांका गांधी सध्या अमेठीच्या दौर्‍यावर आहेत. त्यांच्या तीन ठिकाणी जाहीर सभा झाल्या. या जाहीर सभांमध्ये त्यांनी आम्ही तिथल्या मतदारांवर जोरदार तोंडसुख घेतलेले दिसले.



पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांची कालच अमेठीत सभा झाली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर देशात घराणेशाही आणली आणि तिचे अनुकरण नंतर प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसचे अनुकरण केले. आपापल्या प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व परिवारांकडे सोपवले, असे टीकास्त्र सोडले होते.

त्यानंतर आज प्रियांका गांधी अमेठीत पोहोचल्या आणि त्यांनी अमेठीतील मतदारांवर आगपाखड केली. तुमचे मत खूप महत्त्वाचे आहे आणि ते मत जबाबदारीने दिले पाहिजे. तुम्हाला कोणीही कोणतेही आश्वासन देते आणि तुम्ही भरकटत जाता. डोळे झाकून आंधळेपणाने त्याला मतदान करता. तुमच्या या परिस्थितीला तुम्हीच जबाबदार आहात, अशा शब्दांमध्ये प्रियांका गांधी यांनी मतदारांना फटकारले. तुम्हाला विकास पाहिजे असेल तर काँग्रेसला मतदान करा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

प्रियांका गांधी यांनी केलेल्या आजच्या भाषणावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राहुल गांधी यांनी याआधी अमेठीचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. परंतु 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा फटका बसला. त्यामुळेच तर प्रियांका गांधी यांनी चिडून जाऊन अमेठीतल्या मतदारांवर आगपाखड केली नाही ना!!,

असा सवाल आता सोशल मीडियावर करण्यात येत आहे. राहुल गांधींचा पराभव केला म्हणजे त्यांनी तिथल्या मतदारांनी चूक केली असेच प्रियांका गांधी यांचे मत आहे. अमेठीतल्या मतदारांनी कायम गांधी परिवारालाच मतदान करावे का?, त्यांच्यावर तसे बंधन आहे का?, असा सवालही सोशल मीडियावर अनेक नेटिझन्सनी केला आहे.

Priyanka Gandhi angry with Amethi voters; You repent by voting with your eyes closed !!, she said

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात