नाशिक : महाराष्ट्रात सुरू असलेल्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, इन्कम टॅक्स यांच्या कारवायांच्या मुद्यावर दररोजच्या मीडियातल्या हेडलाइन्स गाजणे याला आता 5 – 6 महिने उलटून गेलेत. यामध्ये अनेक नेत्यांची नावे हेडलाईन मध्ये आली आणि गेली. पण नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडीत जी प्रचंड अस्वस्थता तयार झाली विशेषतः शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार तसेच राष्ट्रवादीचे अन्य नेते यांनी ज्या प्रकारे तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यातून नवाब मलिक हे पुढचे कित्येक दिवस महाराष्ट्राच्या मीडियातील “हेडलाईनचे धनी” बनतील, ती असे वाटत होते. पण हेच नवाब मलिक कोठडीत जाऊन एकच दिवस उलटतो ना उलटतोय तोच नवाब मलिक हेडलाईन मधून “व्यक्ती” म्हणून “गायब” झाले आहेत…!!Nawab Malik “disappears” from headlines the next day as “person”
अनिल देशमुख यांना जेव्हा अटक झाली त्याच्या आधीपासून ते मराठी मीडियातली “हेडलाईन”ची जागा राखून ठेवत होते. सुरुवातीला अनिल देशमुख नेमके कोठे आहेत? म्हणजे ते कोठे गायब झाले आहेत? त्याच्या हेडलाईन झाल्या. नंतर ते ईडी कार्यालयात हजर झाले, तायाच्या हेडलाईन झाल्या. त्यानंतर त्यांना अटक केली. त्यांना कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतरची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्याच्या जवळजवळ 8 – 10 दिवस हेडलाईन होत होत्या. म्हणजे अनिल देशमुख हे नाव “व्यक्ती” म्हणून किमान 8 ते 10 दिवस मीडियाच्या हेडलाईन मध्ये झळकत होते. पण त्या वेळी संजय राऊत किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया तेवढ्या प्रमाणात हेडलाईन म्हणून झळकले नव्हत्या. प्रतिक्रिया येतच होत्या. त्यांच्या बातम्याही मीडियात येत होत्या. पण हेडलाईन मात्र अनिल देशमुखांच्या “व्यक्ती” म्हणून होत होत्या.
Nawab Malik ED : आजचे आक्रमक ठाकरे – पवार हे नवाब मलिकांची पाठराखण कुठपर्यंत करू शकतील…??
आता मात्र नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या तिखट प्रतिक्रिया पाहिल्यावर नवाब मलिक यांची अटक केंद्र सरकारला “खूप जड” जाते का…?? नवाब मलिक केंद्र सरकारला पुरून उरतात का…?? नवाब मलिक कोठडीत काय करतात…?? नवाब मलिक यांची कोठडीत कोणती प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे…?? वगैरे हेडलाईन होतील, असे वाटत होते. पण प्रत्यक्षात काल नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खान हिने राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या प्रेस कॉन्फरन्सची हेडलाईन झाली. नवाब मलिक यांना कोठडीत उशी देण्यात आली. घरचे जेवण देण्यात आले. अशा हेडलाइन बघण्यात आल्या. पण आज मात्र नवाब मलिक हे “व्यक्ती” म्हणून हेडलाईन मधून “गायब” आहेत.
वास्तविक महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर ईडी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांचे छापे हे विषय हेडलाईनचे आहेत. संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे हेडलाईन मध्ये आहेत. पण हेडलाईन चा मुख्य भाग हा रशिया – युक्रेन च्या युद्धाने खाल्ल्यामुळे नवाब मलिक मात्र “व्यक्ती” म्हणून हेडलाईन मधून दुसऱ्या दिवशी “गायब” झाले आहेत.
नवाब मलिक केंद्र सरकारला “भारी” पडतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. पण ते केव्हा “भारी” पडतील?, याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. नवाब मलिक भाजपला “भारी” पडतील की नाही हा भाग अलाहिदा…!! पण ईडीच्या कार्यालयातून “व्हिक्टरी साईन” दाखवत बाहेर पडलेले नबाब मलिक मराठी मीडियाच्या हेडलाईन्स मधून “व्यक्ती” म्हणून दुसऱ्याच दिवशी “गायब” झालेले दिसले आहेत, हे मात्र खरे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App