विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : शहरातील शासकीय घाटी रुग्णालयातील सर्व शासकीय परिचारिका कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष इंदुमती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मागण्यांसाठी आज पासून संपला सुरुवात केली आहे. Nurses at Ghati Hospital, Aurangabad Statewide agitation for various demands
सदरील आंदोलन आज सकाळ सुरु करण्यात आले आहे.शासकीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी निवेदन दिले होते. यामध्ये विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली होती, केंद्राप्रमाणे भत्ता लागू करण्यात यावे, अशा विविध मागण्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाकडे प्रलंबित असून,मात्र राज्य शासनाने यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतले नाही.
आता कामगार संघटनेच्या वतीने राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली असून यामध्ये शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला असून त्याची सुरुवात घाटी रुग्णालयातील परिचारिका यांनी ही संपला साथ देत आंदोलनाची भूमिका आजपासून घेतली आहे. दोन दिवसाचा संप आजपासून सुरू करण्यात आला असून,अशी माहिती शासकीय परिचारिका संघटनेच्या वतीने आज रोजी देण्यात आली आहे.
घाटी रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीसमोर राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देऊन काम बंद आंदोलन आजपासून करण्यात येत असून सदर इसम पहा दोन दिवस सुरू असणार आहे राज्य शासनाने यासंदर्भात निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा पवित्रा शासकीय कर्मचारी संघटनांनी आजपासून आहे.अशी माहिती संपात सहभागी झालेल्या शासकीय परिचारिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष इंदुमती थोरात यांनी सदर माहिती दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App