विशेष प्रतिनिधी
नोएडा : उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये आई रागावली म्हणून खचलेल्या मुलीने संयम गमावून आईच्या डोक्यात लोखंडी तव्याने अनेकदा घाव घालत जन्मदात्रीचा जीव घेतला. The girl committed the murder by stabbing her mother in the head with a tawaNoida; Patience lost for trivial reasons
घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मुलीने आधी पोलिसांची दिशाभूल केली, मात्र चौकशीत तिने हत्येची कबुली दिली. याप्रकरणी कोतवाली सेक्टर-113 पोलिसांनी मुलीला नारी निकेतनमध्ये पाठवले आहे. मुलीची आई ग्रेटर नोएडा येथील एका कंपनीत कामाला होती. ती दिल्लीची रहिवासी होती.
घटनेच्या रात्री दोघीही फ्लॅटमध्ये होत्या. आईने मुलीला खडसावले आणि भांडी धुण्यास सांगितले आणि स्वतः फोनवर बोलू लागली. त्यामुळे संतापलेल्या मुलीने आईच्या डोक्यावर तव्याने वार केले आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर व डोक्यावर वार केले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त, एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, रविवारी रात्री सेक्टर-७७ मधील एका सोसायटीत एका ३४ वर्षीय महिलेचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. मुलीच्या माहितीवरून आजूबाजूच्या लोकांनी तिला कैलास रुग्णालयात दाखल केले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांना याची माहिती मिळताच तपास सुरू केला. तपासादरम्यान मुलीची चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली.त्यामुळे बेडरूममधून बाथरूमपर्यंत रक्त पसरले. यानंतर मुलगी लाईट बंद करून फ्लॅटच्या खाली गेली. थोड्या वेळाने परत आली. धोक्याचा अलार्म लावला आणि शेजाऱ्यांना माहिती दिली. मुलगी नववीत शिकत आहे. तपासात मुलगी नववीत शिकत असल्याचे निष्पन्न झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App