केएल राहुलच्या मदतीशिवाय इतक्या कमीवेळात माझ्या मुलाचं बोनमॅरो ट्रान्सप्लांट शक्य नव्हतं. माझ्या मुलाला वाचवण्यासाठी कोणी भारतीय क्रिकेटर येईल, याची मी कल्पनाही केली नव्हती” असे त्याच्या आईने सांगितलं
विशेष प्रतिनिधी
मुंबई:मैदानावर आपल्या खेळाने राहुल सर्वांचंच मन जिंकून घेतो. पण आता मैदानाबाहेरही राहुलने केलेल्या एका कृतीचं सर्वचजण कौतुक करत आहेत. केएल राहुलने दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या एका 11 वर्षाच्या लहान मुलाची मदत केली आहे. केएल राहुलने लहान मुलाचे प्राण वाचवण्यासाठी 31 लाख रुपयांची मदत केली आहे. त्याच्या या कृतीने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे .GOOD JOB K.L.RAHUL: 31 lakh from KL Rahul to save the life of 11 year old Varad Nalawade …
वरद नलवाडे असं या 11 वर्षाच्या मुलाचं नाव आहे. ज्याला तात्काळ बोन मॅरो प्रत्यारोपणाची (Bone marrow Transplant) आवश्यकता होती. मुलाच्या आई-वडीलांनी एका NGO च्या माध्यमातून पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु केली. केएल राहुलला जेव्हा या बद्दल समजलं तेव्हा त्याने त्या लहान मुलाची मदत केली.
वरद एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. त्याच्या आजारपणावर उपचारासाठी वडिलांनी PF ची सर्व रक्कम खर्च केली. पाचव्या इयत्तेत शिकणारा वरद मुंबईच्या जसलोक रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला अप्लास्टिक एनीमिया नावाचा एक दुर्धर आजार आहे. या आजारात साधा ताप बरा होण्यासाठीही अनेक महिने लागतात. बोन मॅरो ट्रान्सप्लांट हाच या आजारावर एकमेव उपचार आहे.
के एल राहुल –
“वरदबद्दल मला समजलं, तेव्हा माझ्या टीमने गिव इंडियाशी संपर्क साधला. जेणेकरुन आम्हाला त्याची सर्वप्रकारे मदत करता येईल. वरदची सर्जरी यशस्वी ठरली याचा आनंद आहे. वरद लवकरच स्वत:च्या पायावर उभा राहिलं अशी अपेक्षा आहे. मी जे केलय, त्यातून गरजूंना मदत करण्यासाठी इतरांना प्रेरणा मिळेल” .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App