प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या सध्या शिवसेनेवर अक्षरश: दररोज तोफा डागत आहेत. एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत आहेत. पण आज त्यांनी एक चहावाला कोविड सेंटर कसे काय चालवू शकतो? असे म्हणत परळमधील 100 कोटींच्या कॉमेडी सेंटरचा घोटाळा बाहेर काढला आहे. राजीव साळुंके आणि मुंबई महापालिका यांच्यावर त्यांनी जोरदार आरोप केले आहेत.Kirit Somaiya – Contradictory statements of Praveen Darekar !!
पण एकीकडे चहावाला कोविड सेंटर कसे चालवू शकतो?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला असताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या विधानाला छेद देणारे दुसरे वक्तव्य केले आहे. ज्यांचा वैद्यकीय क्षेत्राशी संबंध नाही ते कसे काय कोविड सेंटर चालवू शकतात?, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे. पण त्याच वेळी त्यांनी चहावाल्याने पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनावे पण कोविड सेंटर चालवू नये, असे वक्तव्य केले आहे.
भाजपच्या दोन नेत्यांच्या परस्पर विसंगत विधानांमुळे राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच वेळी कोविड सेंटर चालविणारे राजीव साळुंके यांनी चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर कोविड सेंटर का चालवू शकत नाही?, असा सवाल करत किरीट सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. माझ्या कुटुंबातील पाच माणसे कोविडमुळे मृत्यू पावली. त्यामुळे मी कोविड सेंटर चालवण्याचा निर्णय घेतला. गेल्या 70 वर्षांपासून आमचे दुकान चालू आहे. तेव्हा किरीट सोमय्या यांचा जन्मही झाला नव्हता. महापालिकेची सर्व नियमावली पाळून मी कोविड सेंटर चालवायला घेतले आहे, असा दावा राजीव साळुंके यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App