सामान्य व्यक्तीला इतक्या मोठ्या प्रमाणात भाडे थकवता आले असते का ? असा सवाल आता उपस्थित होतो आहे .Congress Rent Controversy: Millions of rupees rent of Sonia Gandhi’s residence and Congress party headquarters exhausted; Why has the central government not taken action yet?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मागवलेल्या माहितीमध्ये अकबर रोडवरील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाचे १२ लाख ६९ हजार ९०२ रुपयांचे भाडे थकित असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी हे भाडे डिसेंबर २०१२ मध्ये भरले होते. यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अन्य काही नेत्यांच्या सरकारी निवासस्थानांचे भाडेही थकित असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने ही माहिती दिली.Congress Rent Controversy: Millions of rupees rent of Sonia Gandhi’s residence and Congress party headquarters exhausted; Why has the central government not taken action yet?
सामाजिक कार्यकर्ते सुजित पटेल यांनी माहिती अधिकाराचा वापर करून संबंधित धक्कादायक माहिती समोर आणली आहे.
१. सोनिया गांधी यांच्या ‘१० जनपथ रोड’ येथील निवासस्थानाचे थकित भाडे किमान ७० हजार रुपयांहून अधिक आहे. त्यापूर्वी ते सप्टेंबर २०२० मध्ये भरण्यात आले आहे.
२. सोनिया गांधी यांच्या सचिवांच्या चाणक्यपुरीतील निवासस्थानाचे ५ लाख ७ हजार ९११ रुपये भाडेही थकित आहे. याचे भाडे ऑगस्ट २०१३ मध्ये भरण्यात आले होते.
३. जून २०१० मध्ये ‘ए रोज अव्हेन्यू’ ही जागा पक्षाचे कार्यालय बांधण्यासाठी काँग्रेसला देण्यात आली. काँग्रेसने अकबर रोडवरील कार्यालय वर्ष २०१३ मध्येच रिकामे करायला हवे होते; मात्र पक्षाने त्यानंतर सातत्याने मुदतवाढ मागितली आहे.
सोनिया गांधी ने नहीं भरा घर का किराया, चंदा इकट्ठा करेगी BJP #BJP #Congress #SoniaGandhi https://t.co/0Nlp2Oy7bG — Zee News (@ZeeNews) February 11, 2022
सोनिया गांधी ने नहीं भरा घर का किराया, चंदा इकट्ठा करेगी BJP #BJP #Congress #SoniaGandhi https://t.co/0Nlp2Oy7bG
— Zee News (@ZeeNews) February 11, 2022
सोनिया गांधी यांच्या नावे साहाय्यता निधी जमा करणार ! – भाजप
‘निवडणूक न जिंकल्याने सोनिया गांधी यांना घोटाळे करता येत नाहीत. त्यामुळे त्या या निवासस्थानांचे भाडे भरू शकत नाहीत,’ असा आरोप भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी केला. त्यांनी ‘सोनिया गांधी रिलिफ फंड’ (सोनिया गांधी साहाय्यता निधी) नावाचा ‘ट्रेंड’ चालू करून त्यांच्या खात्यात १० रुपये भरल्याचेही यात म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App