प्रतिनिधी
मुंबई : कर्नाटकातील हिजाब वादाचे संपूर्ण देशात पडसाद उमटले असताना मालेगावात आज हिजाब दिन पाळण्यात येणार आहे. काल तेथे हजारो महिलांनी हिजाब परिधान करून निदर्शने केली. मोर्चा काढला. जालन्यातही हिजाब प्रकरणाचे पडसाद उमटले असून हजारो मुस्लिम महिलांनी काल रस्त्यावर येऊन निदर्शने केली. कर्नाटक सरकारचा निषेध केला. बुलढाण्यात अशाच प्रकारचा मोर्चा निघून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने शहरात 144 कलम लागू करण्यात आले आहेHijab day in Malegaon today
मौलाना मुक्ती इस्माईल यांनी मालेगावातील सर्व मौलानांची बैठक घेऊन शुक्रवारी महिलांना हिजाब दिन पाळण्याचे आवाहन केले. त्यामुळे आज घराबाहेर पडताना मालेगावात सर्व महिला हिजाब परिधान करून बाहेर पडणार आहेत. हिजाब परिधान करणे हा मुस्लिम महिलांचा हक्क आहे. तो इबादतसाठी आवश्यक आहे. मुस्लिम महिलांवर कोणीही पोशाखाची सक्ती करू शकत नाही, असे मौलाना मुक्ती इस्माईल त्यांनी सांगितले.
बुलढाण्यात आज मोर्चा आणि निदर्शनांसाठी मोठ्या प्रमाणावर जमा जमण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तेथे 144 कलम अर्थात संचारबंदी लागू केली आहे. दुसऱ्या राज्यात एखादी घटना घडत असेल तर त्यावरून महाराष्ट्रात कोणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील केले यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात 144 कलम लागू करून लागू करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App