प्रतिनिधी
सहारनपूर : मुस्लिम भगिनींना आम्ही तीन तलाक प्रथेच्या छळातून मुक्त केले. तीन तलाक कायदा बनवत त्यांना सुरक्षिततेचा विश्वास दिला. अशावेळी मुस्लिम भगिनी माझे कौतुक करू लागल्या की व्होटबँकेचे काही ठेकेदार अस्वस्थ होतात. त्यांच्या पोटात दुखू लागत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.Prime Minister Narendra Modi’s allegation that the votebank contractor is upset as his Muslim sister is praising me
पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे मोदींची पहिली जाहीर प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, मुस्लिम माता-भगिनी आणि लेकींना त्यांचे हक्क मिळू नयेत म्हणून अनेक मार्गांनी अडथळे आणले जात आहेत. मात्र, या प्रवृत्तीला आम्ही थारा दिलेला नाही. मुस्लिम महिलांच्या हिताचा निर्णय आम्ही घेतला.
उत्तर प्रदेशातील मुस्लिम भगिनींनाही माझे आवाहन आहे. तुम्हाला सुरक्षित वातावरण हवं असेल. जाचातून मुक्ती हवी असेल तर येथे योगी सरकार आवश्यक आहे.समाजवादी पक्षावर जोरदार प्रहार करताना मोदी म्हणाले, घराणेशाहीवर चालणारा हा पक्ष आज सत्तेत असता तर कोविडवरील लस रस्त्यावर विकली गेली असती. लोकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचे काम त्यांनी केले असते.
मुझफ्फरनगर आणि सहारनपूर येथील दंगली घडविणारे हे दंगलखोर आहेत. खोट्या आश्वासनांचा नुसता वर्षाव सुरू आहे. कधीही पूर्ण केली जाऊ शकणार नाहीत अशी आश्वासने दिली जात आहेत. मात्र, उत्तर प्रदेशातील सुजाण जनता यांना चांगलंच ओळखून आहे. जनतेने यांना आधीच नाकारले आहे. त्यांच्या नशीबात आता सत्ता नाही. उत्तर प्रदेशच्या विकासासाठी, भयमुक्त वातावरणासाठी, दंगलमुक्त राज्यासाठी भाजप सरकार आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App