तुमचे कर्ज सध्या स्वस्त होणार नाही. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. याचा अर्थ असा आहे की, तुमच्या सध्याच्या EMI मध्ये कोणताही बदल होणार नाही. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी सांगितले की, चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो आणि रिव्हर्स रेपो दरांमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Loans are currently expensive: interest rates remain unchanged for 10 times in a row, RBI monetary committee maintains repo and reverse repo rates
वृत्तसंस्था
मुंबई : तुमचे कर्ज सध्या स्वस्त होणार नाही. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. याचा अर्थ असा आहे की, तुमच्या सध्याच्या EMI मध्ये कोणताही बदल होणार नाही. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी सांगितले की, चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो आणि रिव्हर्स रेपो दरांमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्जाचे व्याजदर ठरवणारा रेपो दर सध्या ४% आहे आणि रिव्हर्स रेपो दर ३.३५% आहे. व्याजदरांबाबत निर्णय घेणाऱ्या RBIच्या MPCमध्ये 6 सदस्य असतात. यापैकी 3 सरकारचे प्रतिनिधी आहेत आणि उर्वरित 3 सदस्य गव्हर्नरसह आरबीआयचे प्रतिनिधीत्व करतात. RBI फक्त MPCच्या तीन दिवसीय बैठकीत रेपो दर आणि रिव्हर्स रेपो रेट यावर निर्णय घेते.
RBIने सलग 10व्यांदा रेपो दरात बदल केलेला नाही. 2020 च्या सुरुवातीला, मध्यवर्ती बँकेने मार्चमध्ये रेपो दरात 0.75% (75 bps) आणि मे मध्ये 0.40% (40 bps) कपात केली होती आणि तेव्हापासून रेपो दर 4% च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. त्यानंतर आरबीआयने दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
रेपो दर म्हणजे RBI कडून बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते. या कर्जातून बँका ग्राहकांना कर्ज देतात. रेपो दर कमी म्हणजे बँकेकडून अनेक प्रकारची कर्जे स्वस्त होतील. तर रिव्हर्स रेपो रेट हा रेपो दराच्या अगदी उलट आहे. रिव्हर्स रेट म्हणजे रिझव्र्ह बँकेकडून बँकांनी ठेवलेल्या ठेवींवर मिळणारा व्याज दर. रिव्हर्स रेपो रेटद्वारे बाजारात तरलता नियंत्रित केली जाते. म्हणजेच रेपो दर स्थिर असेल तर बँकांकडून मिळणारे कर्जाचे दरही स्थिर राहतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App