विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस नेत्या आणि पंजाब प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या खराब पार्श्वभूमीच्या प्रतिमेवर खिल्ली उडवली पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी चन्नी यांना गरीब समजणे म्हणजे त्यांची दिशाभूल असल्याचीही टीकाही केली आहे.Navjot Singh Sidhu’s wife mocking Charanjit Singh Channy and criticizes Rahul Gandhi
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे पती आणि पक्षाचे पंजाब प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू हेच योग्य पर्याय ठरले असते, असे सांगून नववज्योत कोर म्हणाल्या, क्रिकेटमधून राजकारणात आलेले सिद्धू हे त्यांचे पती आहेत या व्यतिरिक्त, सहा महिन्यांत पंजाबमध्ये बदल घडवून आणण्यासाठी ते एक चांगला पर्याय होते.
पंजाब विधानसभेच्या 2022 च्या निवडणुकीत काँग्रेसने चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी पक्षाकडो नवज्योतसिंग सिद्धू आणि चरणजीत चन्नी हे दोन पर्याय होते. पण पक्षाच्या हायकमांडने चन्नी यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
पण नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू या चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्याने खूश नाहीत.चन्नी यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी राहुल गांधी म्हणाले होते की, पंजाबचे लोक म्हणतात की आम्हाला गरीब घरातून आलेला मुख्यमंत्री हवा आहे,
जो गरीबी आणि भूक समजून घेतो. हा निर्णय अवघड होता, पण तुम्ही लोकांनी तो सोपा केला. त्याचवेळी, चन्नी अनेकदा निवडणूक प्रचारादरम्यान स्वत:ला गरीब पार्श्वभूमीतून आल्याचा उल्लेख करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App