विशेष प्रतिनिधी
सांगली : राज्य सरकारने किराणामाल दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. या निर्णयाला काही संघटनांनी विरोध दर्शविला. या निर्णयाच्या विरोधात संभाजीराव भिडे यांची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना देखील रस्त्यावर उतरली आहे. राज्य सरकारने वाईन विक्रीचा निर्णय रद्द करावा, तसेच दारू विक्रीवर बंदी घालावी या मागणीसाठी सांगली शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. Against the decision to sell wine Awareness rally of Shiv Pratishthan
या फेरीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यासह महिला, शेकडो धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन, निषेधाच्या घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढण्यात आली. मारुती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरवात झाली. मारुती चौक, हरभट रोड, महापालिका, राजवाडा चौक, स्टेशन चौक, बदाम चौक, जुनी पोलीस लाईन मार्गे शिवाजी मंडई येथे या फेरीची सांगता झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App