विशेष प्रतिनिधी
पुणे : येरवडा शास्त्रीनगर परिसरात माॅलचे बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले. त्यापैकी दोघे गंभीर आहेत. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या या दुर्घटनेत ढिगाखाली अनेक जण अडकल्याची भीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील एका बांधकामाधीन इमारतीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांविषयी शोक व्यक्त केला. 5 workers killed in Yerwada building collapse; two seriously; Many were trapped under the rubble
गल्ली क्रमांक 8 येथील एका इमारतीचा लोखंडी सांगडा बांधण्याचे काम सुरु होते. मॉलच्या तळ मजल्याचे काम सुरु असताना तो अचानक कोसळला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सर्व जखमी व मरण पावलेले मजूर बिहारचे रहिवासी आहेत. या दुर्घटनेत ढिगाखाली अनेक जण अडकल्याची भीती पुणे अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे. काल रात्री पावणेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
काही कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकल्याची शक्यता आहे. रात्रीच ढीग हटविण्याचे काम सुरू करण्यात आले.
मॉलच्या तळ मजल्याचे काम सुरु असताना रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या संदर्भात लवकरच गुन्हा दाखल केला जाणार आहे. स्लॅब टाकण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, शिवाय सुरक्षेचे नियम पाळले गेले नाहीत, असे सांगितले जाते.मॉल बांधला जात असताना लोखंडी सांगाडा कोसळला. कोसळण्याचे कारण तपासले जात आहे,अशी माहिती पुणे पोलिसांचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी माहिती दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App