विशेष प्रतिनिधी
पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते पुष्कर प्रसाद आबनावे यांच्या पुढाकारातून महर्षीनगर भागातील ३१ अपंग महिलांना गृहपयोगी व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. महिनाभर पुरेल इतके धान्य, किराणा व अन्य साहित्य देण्यात आले. Gift of household items to women with disabilities
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारी रोजी जन्मलेल्या परिसरातील लहान मुलींना शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात पुष्कर आबनावे सातत्याने या भागातील गरजू नागरिकांच्या मदतीला धावून येत आहेत.
मोफत अन्नदान, जीवनावश्यक वस्तूंची मदत, औषधोपचार, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, आधार-कार्ड पॅनकार्ड नोंदणी शिबीर घेत नागरी उपक्रम अनोख्या पद्धतीने राबवले आहेत.पुष्कर प्रसाद आबनावे म्हणाले, “अपंगांना रोजगाराचे मर्यादित साधन असते. शिवाय, कोरोनामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अशावेळी त्यांची समस्या काही प्रमाणात का होईना सोडवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी २६ जानेवारी रोजी जन्म झालेल्या मुलींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबवला. या भागातील नागरिकांकडून सर्वच उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने काम करण्यात आनंद मिळतो आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App