प्रतिनिधी
मुंबई : पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयासमोर काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी आणि भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड एकमेकांच्या समोर आले. त्यांच्यासमवेत असलेले कार्यकर्ते काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते अक्षरशः एकमेकांना भिडले.Congress – BJP workers fight over Pegasus issue in Mumbai
पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते वसंत स्मृती कार्यालयातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बजेट वरील भाषण ऐकण्यासाठी जमले होते. यामध्ये आमदार प्रसाद लाड तसेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा हे देखील होते. काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन पाहून भाजपचे नेते आणि कार्यकर्ते संतापले. ते देखील काँग्रेस कार्यकर्त्यांना सामोरे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. घोषणाबाजी झाली. पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी आमदार झिशान सिद्दिकी यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते काही काळ शांत झाले. परंतु अजूनही मुंबईत या निमित्ताने भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वेतनापासून तणाव असून पोलिसांसमोर वेगळेच आव्हान उभे राहिले आहे.
मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसह प्रसाद लाड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने निघाले होते. पोलिसांनी भाजपचा मोर्चा अडवला. मुंबईत भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस विरोधात आक्रमक झाले. भाजपवर कुणी गुंडशाहीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याच पद्धतीने उत्तर देऊ, आम्ही संघर्ष करणारी लोक आहोत. आम्हाला धमक्या देऊ नका, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला. काँग्रेस भाजपच्या वसंत स्मृतीवर हल्ला करत असाल तर आम्ही उत्तर देऊ, पोलिसांच्या विनंतीमुळे थांबत आहोत. पोलिसांनी काँग्रेसच्या आंदोलक कार्यकत्यांना अटक केली नाही तर आम्ही येथून पुढे जाऊ, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला.
काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्त्वात युवक काँग्रेसने भाजपच्या कार्यालयावर पेगाससच्या मुद्यावर आंदोलन केले. पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा अडवला. पेगाससच्या माध्यमातून देशातील कोणत्याही व्यक्तीची हेरगिरी केली जात आहे. राहुल गांधी, यांच्यासह देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची हेरगिरी करण्यात आली. झिशान सिद्दीकी यांना पोलिसांना ताब्यात घेतले.
भाजपचे कार्यकर्ते बौद्धिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या अशा प्रकारांना सामोरे जाण्यास तयार असल्याचं चंद्रकातं पाटील म्हणाले. भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचे संकेत दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App