केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ‘आत्मनिर्भर भारत 2022-23’चा अर्थसंकल्प सादर केला. 2023 हे वर्ष भरड धान्याचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. रब्बी 2021-22 मध्ये 163 लाख शेतकऱ्यांकडून 1208 मेट्रिक टन गहू आणि धान खरेदी करण्यात येणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्यात येणार असून भारतातील गरिबी निर्मूलनाच्या ध्येयावर जोमाने काम केले जाणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला चालना देणार असून 100 गती शक्ती कार्गो टर्मिनस बनवण्यात येणार आहेत. Budget 2022 MSP amount directly in the account, 2023 is the coarse grain year, purchase of 1208 metric tons of wheat and grain from 63 lakh farmers, what happened to the share of farmers in the budget? Read more
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ‘आत्मनिर्भर भारत 2022-23’चा अर्थसंकल्प सादर केला. 2023 हे वर्ष भरड धान्याचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. रब्बी 2021-22 मध्ये 163 लाख शेतकऱ्यांकडून 1208 मेट्रिक टन गहू आणि धान खरेदी करण्यात येणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्यात येणार असून भारतातील गरिबी निर्मूलनाच्या ध्येयावर जोमाने काम केले जाणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला चालना देणार असून 100 गती शक्ती कार्गो टर्मिनस बनवण्यात येणार आहेत.
Procurement of wheat in Rabi season 2021-22 and the estimated procurement of paddy in Kharif season 2021-22 will give cover 1208 lakh metric tonnes of wheat & paddy from 163 lakh farmers& Rs 2.37 lakh crores will be the direct payment of MSP value to their accounts: FM Sitharaman pic.twitter.com/cAAv65Dnm0 — ANI (@ANI) February 1, 2022
Procurement of wheat in Rabi season 2021-22 and the estimated procurement of paddy in Kharif season 2021-22 will give cover 1208 lakh metric tonnes of wheat & paddy from 163 lakh farmers& Rs 2.37 lakh crores will be the direct payment of MSP value to their accounts: FM Sitharaman pic.twitter.com/cAAv65Dnm0
— ANI (@ANI) February 1, 2022
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सरकारने एमएसपीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 2.37 कोटी रुपये पाठवले आहेत आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. सरकारकडून रासायनिक व कीटकनाशकमुक्त शेतीचा प्रसार वाढवण्यावर भर दिला जात आहे.
25 हजार किमी राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीने देशातील 5 मोठ्या नद्या जोडण्याचे कामही केले जाणार आहे. देशात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर काम सुरू असून गंगेच्या काठावर राहणाऱ्या शेतकऱ्यांना मदत केली जाईल.
शेती आणि ग्रामीण उद्योगांसाठी स्टार्टअप्सना वित्तपुरवठा करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, जे कृषी उत्पादन मूल्य साखळीसाठी संबंधित आहे. स्टार्टअप्स FPO ला समर्थन देतील आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञान प्रदान करतील. याशिवाय, पीक मूल्यांकन, जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन, कीटकनाशके आणि पोषक तत्त्वांची फवारणी यासाठी किसान ड्रोनच्या वापराला चालना दिली जाईल, असेही अर्थमंत्री म्हणाल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App