प्रतिनिधी
मुंबई : परीक्षेसाठी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांचा आंदोलनावर पोलिसांनी मुंबईतील धारावी लाठीमार केला. संपूर्ण महाराष्ट्रात हा मुद्दा राजकीयदृष्ट्या पेटला असून सोशल मीडियावर त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केलाच का? त्यांना आंदोलनाची पूर्वकल्पना कशी आली नाही?, असे संतप्त सवाल सोशल मीडियावर करण्यात येत आहे.Online – Offline exams mix: Why beat up underage students ?; Anger on social media !!
दहावी आणि बारावी विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन घ्यावे या मागणीसाठी मुंबईत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. केवळ मुंबईच नाही तर नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद येथे विद्यार्थी याच मागणीसाठी रस्त्यावर उतरले. यासह धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घेराव घातला. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेला विरोध दर्शवत गदारोळ केला. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, याकारणाने परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
मुंबईत विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्याच्या घराला घेराव घालत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या काही दिवसांपूर्वी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्यानंतर आज विद्यार्थ्यी त्याविरोधात आक्रमक झाले. शाळा ऑनलाईन असताना परीक्षा ऑफलाईन का? असा आक्रमक सवाल आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. या मुद्द्यावर ठाकरे – पवार सरकारच्या अन्य मंत्र्यांनी तसे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिले नाही.
धारावी परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी सकाळपासूनच जमले. यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, अशी त्यांची मागणी असून कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन आणि वेळापत्रकानुसार होणार असल्याचे सांगितले होते. परंतु हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही. याप्रकरणी सोशल मीडियावर देखील विद्यार्थ्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटताना दिसताय.
– भाजपचा सरकारवर जोरदार निशाणा
या आंदोलनावरून भाजपने सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे, या राज्यात लोकशाही राहिलेली नाही, मनाला येईल तेव्हा लाठीमार, मनाला येईल तेव्हा जेलमध्ये टाकायचे, मनाला येईल तेव्हा गुन्हे दाखल करायचे, असा धंदा सरकारकडून सुरू असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहे. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे पाप हे सरकार करतेय, अशी टीका दरेकरांनी केली आहे. यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, असेही दरेकर म्हणाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App