विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह गुन्ह्यातील आरोपी संजय पुनमिया याने व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल याला फसवण्यासाठी एका विशेष सॉफ्टवेअरद्वारे अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याचा आवाज काढल्याचे स्पष्ट झाले आहे. हा फोन खरा वाटावा यासाठी व्हीपीएनचा वापर करण्यात आला.Underworld don Chhota Shakeel’s voice was made by software to threatened businessman
कोणालाही संशय येऊ नये यासाठी हे काम करण्यासाठी पुनमिया याने सायबर तज्ज्ञांची मदत घेतली होती. या प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून या प्रकरणई सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
आरोपीने फोन कॉलचा आवाज शकीलच्या आवाजाशी जुळवता यावा यासाठी विशेष सॉफ्टवेअरचा वापर केला असल्याचे तपासात आढळून आले आहे. हा फोन अग्रवालच्या वतीने पुनमियाला करण्यात आल्याचे भासवण्यात आले होते. या बरोबर अग्रवाल याचे छोटा शकीलशी जवळचे संबंध असल्याचे सिद्ध करण्याचाही प्रयत्न झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
श्यामसुंदर अग्रवाल याने तक्रार दाखल केल्यानंतर परमबीर सिंह, संजय पनमिया, विकासक सुनील जैन, तसेच दोन एसीपी अधिकारी, एक डिसीपी आणि दोन पोलिस निरीक्षकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी पुनमिया आणि जैन यांना अटकही केली होती.
या प्रकरणाचा योग्य तयार व्हावा यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. पुढे हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले. नंतर सीआयडीने पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनाही अटक केली.
परमबीर सिंह आणि त्यांच्या माणसांनी आपल्याला मकोका प्रकरणात अडकल्याची तक्रार अग्रवाल याने केली होती. या बरोबरच अग्रवाल यांच्यावर ५० लाख रुपये आणि काही मालमत्तांसाठी दबाव आणण्याचा त्यांचा डाव असल्याचाही अग्रवाल यांचा आरोप आहे. परमबीर सिंह हे अँटिलिया प्रकरणात अडकल्यानंतरच अग्रवाल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडेही सिंह यांची तक्रार केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App