विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणाऱ्यालाच नोटीस! असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.Is the head of the government in place? If you go to RTI to inspect the file, notice to the information seeker only! Question by Devendra Fadnavis
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नगरविकास मंत्रालयात अधिकाºयांच्या खुर्चीवर बसून सरकारी फाईल तपासल्यावरून वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सोमय्यांच्या या कृतीवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या यांना नोटीसही प्राप्त झाली आहे.
यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. फडणवीस म्हणाले, या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणाऱ्या बोलवित्या धन्यावर कारवाई करा!
मंत्रालयातील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही आहेत. हे फोटो कुणी काढले हे जरी शोधले तरी ते प्रसारित कुणी केले, हे सहज स्पष्ट होईल. पण, महाविकास सरकारचे डोके नेहमी उलटेच चालते. सरकारी कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा नोटीसा!, हाच का तुमचा पारदर्शी कारभार?
शासनाच्या कार्यालयात जाऊन माहिती अधिकारात माहिती मागणे, फाईलचे निरीक्षण करणे, हा अधिकार सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दीर्घ लढ्यानंतर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला. एखादी प्रक्रिया माहिती नसेल तर ती जाणून घ्या. केवळ हुकूम सोडून कारवाई कसली करता? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App