ज्यांच्या बद्दल तक्रारी असतील पुरावे असतील त्यांची ईडीकडून चौकशी होते. मात्र आपण काही केले नाही तर घाबरण्याचे कारण काय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना उद्देशून केला आहे.
विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : ज्यांच्या बद्दल तक्रारी असतील पुरावे असतील त्यांची ईडीकडून चौकशी होते. मात्र आपण काही केले नाही तर घाबरण्याचे कारण काय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना उद्देशून केला आहे. If nothing is done, why be afraid, Devendra Fadnavis questions Sanjay Raut
शिवसेना नेते व राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) नोटीस आली आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून तपास सुरू असून याच प्रकरणात वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. यावरुन संजय राऊत यांनी थयथयाट चालू केला आहे. हेच राऊत महाशय अर्णब गोस्वामीविरोधात आकसाने कारवाई केली जात असताना तथ्य असेल ते बाहेर येईल. दोषी नसाल तर घाबरू नका, या प्रकारची भूमिका घेत तारे तोडत होते. स्वतःच्या पत्नीविरोधात तक्रार झाल्यानंतर मात्र राऊत एकदम भेदरुन गेले आहेत.
आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही, ज्यांच्याकडे लपवण्यासारखे असते ते एकतर पळून जातात किंवा भाजपमध्ये जातात, असे राऊत म्हणाले होते. ईडीला काही बाबी तपासायच्या असतील तर त्याला आमचं सहकार्यच राहील. असे नमूद करत आपली पत्नी चौकशीला सामोरी जाणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले होते.
याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांच्या बद्दल तक्रारी असतील पुरावे असतील त्यांची ईडीकडून चौकशी होते. मात्र आपण काही केले नाही तर घाबरण्याचे कारण काय? कोणतीही एजन्सी कोणावर थेट कारवाई करू शकत नाही. भाजपने कोणत्या ही चौकशी संस्थेचा गैरवापर केला नाही. काँग्रेसच्या काळातच तो अधिकचा झाला आहे.
फडणवीस म्हणाले, बांधकाम क्षेत्राबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. यातील घोटाळे मी स्वत: उघडकीस आणले आहेत. त्याची चौकशी करा अन्यथा मला उच्च न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच कोकणातील शेतकऱ्यांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. मी अनेकांशी बोललो आहे. त्यांनीही अशी कोणतीही मदत आली नसल्याचे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App