विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांना युतीच्या वादात ओढल्याने त्यांच्या कन्या खासदार पूनम महाजन चवताळल्या आहेत. दोन मर्दांनी हिंदूत्वासाठी युती केली. नामर्दासारखे कार्टून दाखवू नका, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. त्यानंतर राऊत यांनी हे ट्विट डिलिट केले.TwoMard form alliance for Hindutva, don’t show cartoons like Namardas
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत भाजपवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रात बाळासाहेब ठाकरे एका चित्रावर बसले असून त्यांनी दुसऱ्या खुर्चीवर पाय ठेवले आहे. तसेच बाजूला एक स्टूलही आहे.
त्यावेळी तिथे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन उभे असतात. बाळासाहेब त्यांना बसण्यास सांगतात, असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. हे व्यंगचित्र शेअर करताना ह्यकोण कुणामुळे वाढले? उघडा डोळे.. बघा नीट, असे कॅप्शन दिले आहे.
राऊतांनी ट्वीट केलेल्या या व्यंगचित्रावरुन पूनम महाजन यांनी टीका केली आहे. ट्वीटला रिट्वीट करत पुनम महाजन यांनी स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका, असे म्हटले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन या दोघांना शिवसेना-भाजपचे शिल्पकार म्हटले जाते. दोघांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यावेळी युतीमध्ये कधीही बेबनावाचे वातावरण तयार झाले की दोघांची भेट झाल्यावर ते निवळत असे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App