तो अठरा वर्षांचा होता. या युवकाने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.Shocking incident in Aurangabad, student commits suicide by hanging while keeping bye bye status in mobile
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील ताजनापुर गावात धक्कादायक घटना घडली आहे.मोबाईलवर बाय बायचे स्टेटस ठेवत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.मयत युवकाचे नाव राजेश ज्ञानेश्वर काळे असे आहे.तो अठरा वर्षांचा होता.या युवकाने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
घरातील सर्व व्यक्ती शेतात कामाला गेलेले पाहून राजेशने स्वतःच्या मोबाईल वर बाय बाय स्टेटस ठेवल.स्टेटस ठेवल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.दरम्यान राजेशच्या मिञांनी त्याचा हा स्टेटस बघुन राजेशचा शोध घेतला .यावेळी त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.
दरम्यान या घटनेची माहिती बाजारसावंगी पोलीस ठाण्यात देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने युवकाचा मृतदेह खाली उतरवला.त्यानंतर मृत्यूदेह शेवविच्छेदनासाठी बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. दरम्यान पोलीस पुढील तपास करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App