नव्या अभ्यासक्रमात आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डप्रमाणे देशातील थोर व्यक्तींची ओळख करून दिली जाईल.अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.Now new curriculum will be implemented for first and second classes, informed Education Minister Varsha Gaikwad
विशेष प्रतिनिधी
नाशिक : शालेय शिक्षणमंत्री नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.दरम्यान या दौऱ्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी पहिली आणि दुसरीसाठी नवा अभ्यासक्रम तयार होत असल्याचे सांगितले.यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या की,” महाराष्ट्रातील शाळांचा पहिली आणि दुसरीच्या वर्गांचा नवा अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.लवकरच पहिली आणि दुसरीसाठी नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे.
नव्या अभ्यासक्रमात आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डप्रमाणे देशातील थोर व्यक्तींची ओळख करून दिली जाईल.अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तसेच विशेष म्हणजे जरी पहिली आणि दुसरीचा नवा अभ्यासक्रम तयार झाला तरी तो नव्या शैक्षणिक वर्षापासूनच लागू होईल. तसेच २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात असल्यामुळे या शैक्षणिक वर्षात नवा अभ्यासक्रम लागू होणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App