
बिहार विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला चांगलाच दणका दिल्यावर आता असदुद्दीन ओवेसी यांची एमआयएम गुजरात आणि राजस्थानातही दणका देण्याच्या तयारीत आहे. येथील मुस्लिम व्होट बॅंकेला सुरूंग लागणार असून त्यासाठी ओवेसी यांनी भारतीय ट्रायबल पार्टीशी (बीटीपी) आघाडी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
जयपूर : बिहार विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला चांगलाच दणका दिल्यावर आता असदुद्दीन ओवेसी यांची एमआयएम गुजरात आणि राजस्थानातही दणका देण्याच्या तयारीत आहे. येथील मुस्लिम व्होट बॅंकेला सुरूंग लागणार असून त्यासाठी ओवेसी यांनी भारतीय ट्रायबल पार्टीशी (बीटीपी) आघाडी केली आहे. Owaisi lead with the BTP
बीटीपी आणि ओवेसी एकत्र लढले तर राजस्थान आणि गुजरात या दोन्ही ठिकाणी कॉंग्रेसला फटका बसू शकतो. छोटूभाई वासवा यांच्या भारतीय ट्रायबल पार्टीचे राजस्थानमध्ये दोन आमदार आहेत. त्यांनी अगोदरच अशोक गेहलोत सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. याचे कारण म्हणजे मित्र पक्ष असलेल्या बीटीपीचा उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ नये यासाठी कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली. त्यामुळे दुर्गापूर जिल्ह्यात बीटीपीच्या उमेदवाराचा पराभव झाला.
त्याचबरोर पंचायत समितीच्या तीन जागांवरही बीटीपीचा पराभव झाला. त्यामुळे कॉंग्रेसला धडा शिकविण्यासाठी बीटीपीने ओवेसींसोबत आघाडी करण्याचे ठरविले आहे. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढविणार आहे. त्याचा मोठा फटका कॉंग्रेसला बसू शकतो.
छोटूभाई वासवा भरोच येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आम्ही दोन पक्ष एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार आहोत. कॉंग्रेसला धडा शिकविण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. यामुळे कॉंग्रेसचे गुजरातमधील नेते सैरभैर झाले आहेत. बीटीपीला भाजपाची बी टीम असे म्हणू लागले आहेत.
Owaisi lead with the BTP
मात्र, भाजपाने याला आम्ही महत्व देत नसल्याचे सांगितले आहे. आम्ही दोन्ही पक्षांशी विकासाच्या मुद्यावर लढू असे भाजपाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी सांगितले. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते आदिवासी आणि मुस्लिम ही कॉंग्रेसची परंपरागत व्होट बॅंक यामुळे विभागली जाणार आहे. याचा मोठा फायदा भाजपाला होऊ शकतो.
Array