विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या आमदार आदिती सिंह यांच्यासोबत राहूल गांधी यांचे लग्न होणार अशा अफवा पसरल्या होत्या. त्याच आदिती सिंह यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्यांना भाजपने रायबरेलीतून उमेदवारी दिली आहे.The BJP had given candidature from Rae Bareli to the MLA with whom rumors of Rahul Gandhi’s marriage had spread
कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून २०१७ मध्ये आदिती सिंह काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यांनी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
मागील अनेक दिवसांपासून त्या काँग्रेसविरोधी वक्तव्याने चर्चेत आल्या होत्या. त्या आता भाजपच्या रायबरेलीतील उमेदवार असणार आहेत.अदित सिंह या मूळ लखनौच्या आहेत. त्यांचे वडील अखिलेश सिंह काँग्रेसचे दिग्गज नेते होते. त्यांना उत्तरप्रदेशात बाहुबली नेता म्हणून ओळखले जायचे.
अखिलेश सिंह यांचे ऑगस्ट २०१९ मध्ये निधन झाले. ते रायबरेली मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २०१७ सालापासूनच अदिती सिंह यांनी वडील अखिलेश सिंह यांचे राजकारण सांभाळायला सुरुवात केली. त्यांनी रायबरेली मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली.
बहुजन समाज पक्षाचे उमेदवार शहबाज खान यांना तब्बल ९० हजार मतांनी पराभव केला. अदिती सिंह यांची उत्तरप्रदेश विधानसभेतील सर्वांत तरुण आमदार ही ओळख आहे. मात्र, त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App