विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून बहुजन समाज पक्ष निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडल्यासारखे वाटले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यातच थेट लढत होईल, असे वातावरण तयार झाले होते.In Uttar Pradesh, the BSP will form an alliance with ten smaller political parties to garner votes
मात्र, बहुजन समाज पक्षाने दहा छोट्या पक्षांशी युती करून आपणही रिंगणात असल्याचे दाखवून दिले आहे. बसपचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा युतीची घोषणा करताना म्हणाले, आदरणीय भगिनी श्रीमती मायावती जी यांच्या विकसित विचारांनी प्रेरित होऊन दहा राजकीय पक्षांनी बहुजन समाज पक्षाला पाठिंबा दिला आहे.
सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या विचारधारेने पुढे जाण्याचा आणि काम करण्याचा संकल्प केला आहे.तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने आणि सहकायार्ने बहुजन समाज पक्षाला अधिक ऊर्जा आणि गती मिळेल. जनतेच्या आशीवार्दाने आम्ही बहेनजींना पाचव्यांदा मुख्यमंत्री बनवू. यामुळे उत्तर प्रदेश पुन्हा प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल, असेही सतीश चंद्र म्हणाले.
बसपला भारत जनशक्ती पार्टी, परिवर्तन समाज पार्टी, विश्वशांती पार्टी, संयुक्त जनादेश पार्टी, आदर्श संग्राम पार्टी, अखंड विकास भारत पार्टी, सर्वजन आवाज पार्टी, आधी आबादी पार्टी, जागृत जनता पार्टी, सर्वजन यांचा पाठिंबा मिळाला आहे. बसपने सुभासपा, रालोद आणि महान दल सारख्या पक्षांशी युती केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App