प्रतिनिधी
पणजी : गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना काँग्रेसने थारा दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेस विरोधात पाखड केली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या मदतीशिवाय गोव्यात काँग्रेस एकही जागा जिंकू शकणार नाही, असा दावा केला आहे.In Goa, the Congress did not support the NCP and Shiv Sena
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत हे सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षाबरोबर महाविकास आघाडी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
प्रफुल्ल पटेल यांच्या निर्णयांनी लक्षद्वीप धुमसू लागले, सर्वच राजकीय नेत्यांचा आक्षेप
परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी धूप घातली नाही. त्यामुळे चिडून जाऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसला बाजूला करत आपल्याच दोन पक्षांची आघाडी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर आमच्या मदतीशिवाय काँग्रेस एकही जागा जिंकू शकणार नाही. उलट काँग्रेस भाजपला मोकळे रान देत आहे असा आरोप प्रफुल्ल पटेल जितेंद्र आणि संजय राऊत यांनी केला आहे.
यापुढे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आपापसातच जागा वाटप करून गोवा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App