विशेष प्रतिनिधी
अमरावती : अमरावती येथील उड्डाण पुलावर उभारलेला शिवरायांचा पुतळा आज पहाटे प्रशासनाने हटविल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे.Statue of Shivaji maharaj removed from the bridge at Amravati ; illegally claims, raised tensions,
आमदार रवी राणा यांच्या हस्ते चारच दिवसांपूर्वी या पुतळ्याचे अनावरण झाले होते. मात्र, तो परवानगी न घेता उभारल्याचा दावा प्रशासनाने केला. १२ जानेवारीला मोठ्या उत्साहात पुतळ्याचे उदघाटन केले होते.
महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी हा पुतळा बेकायदा उभाल्याचा आरोप करून तो हटविण्याची मागणी प्रशासनाकडे केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई प्रशासनाने केली असल्याचे बोलले जात आहे.
पुतळा हा सामान्य व्यक्ती किंवा नेत्यांचा नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. विशेष म्हणजे राज्यात शिवसेनेचे सरकार असताना महाराजांचा पुतळा हटविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App