कलम ३७० हटवून जम्मू काश्मीरला मोदी सरकारने देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे आता काश्मीरी नागरिकांना स्वीकारणे संपूर्ण देशाला शक्य झाले आहे. त्यामुळे ‘काश्मीर की कली’ आता सातारच्या पाटलांची सून बनली आहे.
विशेष प्रतिनिधी
कराड : कलम ३७० हटवून जम्मू काश्मीरला मोदी सरकारने देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे आता काश्मीरी नागरिकांना स्वीकारणे संपूर्ण देशाला शक्य झाले आहे. त्यामुळेच ‘काश्मीर की कली’ आता सातारच्या पाटलांची सून बनली आहे.
kashmir girl marriage in satara news
भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या अजित पाटलांनी काश्मीरच्या सुमन देवींसोबत विवाह केला. आधी किस्तवाडमध्ये काश्मिरी पद्धतीने दोघांनी लग्नगाठ बांधली गेली. नंतर कराडमध्ये महाराष्ट्रीय पद्धतीने काश्मिरी नातेवाईकांच्या उपस्थितीत सप्तपदी करण्यात आली. मात्र, साताऱ्याचा पुत्र आणि काश्मीरच्या ‘कली’च्या प्रेमकहाणीचं लग्नात रुपांतर होण्यात कलम 370 चा मोठा अडथळा होता. यामुळे अजित आणि सुमन देवी काही महिने निराश होते. मात्र कलम हटवलं आणि अजितने लग्नाचा बार उडवून दिला.
अजित यांचा विवाह मोजक्या कराडकर नातेवाईकांच्या आणि जम्मू काश्मीरमधील नातेवाईकांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. अजित प्रल्हाद पाटील हे कराड तालुक्यातील उंडाळे गावातील रहिवासी. भारतीय सैन्य दलात सैनिकी शिक्षणाचे ते प्रशिक्षण देतात. सध्या ते झाशीत कार्यरत आहेत. याच ठिकाणी राहणाऱ्या काश्मीरच्या सहकाऱ्याकडे पाहुणी म्हणून आलेल्या जम्मू कश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यातील जोधानगर पलमार गावात राहणाऱ्या सुमन देवी भगत हिच्याशी त्याची भेट झाली. पहिल्या भेटीतच दोघांना प्रेमाचे अंकुर फुलले.
अजित पाटील मार्च 2020 मध्ये सुमनच्या नातेवाईकासोबत 10 दिवसाच्या सुट्टीवर जम्मू काश्मीरला गेले होते. कोरोनामुळे अचानक देशभर लॉकडाऊन जाहीर झाला आणि तब्बल तीन महिने सुमन देवीच्या घरी अजित पाटील यांना राहावे लागले. याच तीन महिन्यात अजित आणि सुमन यांचे नाते आणखी घट्ट झाले. सुमन देवी यांच्या कुटुंबीयांना अजित यांना जवळून समजुन घेता आले आणि सर्वांच्या संमतीने दोघांची लग्नगाठ पक्की झाली .
सरकारने जर 370 कलम हटवले नसते तर आम्ही लग्न करु शकलो नसतो. 370 कलम हटवल्याचा सर्वात जास्त फायदा मला झाला. माझ्यासाठीच कलम हटवल्याची भावना अजित पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्रीयन पध्दतीने दोघांनी उखाणेही घेतले. सुमनने उखाणा घेतलाकी, वन बोटल टू ग्लास, अजित मेरा फर्स्ट क्लास. तर अजित पाटील यांचा उखाणा होता, संभाजीराजे शिवछत्रपतींचा छावा, सुमनचं नाव घेतो शिवरायांचा मावळा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App