बिहारमधील निवडणुकीत कॉंग्रेसने आपल्या खराब कामगिरीमुळे राष्ट्रीय जनता दलाच्या तोंडातील सत्तेचा घास हिरावून घेतला. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना राहुल गांधी सिमल्यात पर्यटन करत होते. यावरून चिडलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याने सोनिया गांधी यांना सल्ला दिला आहे. पुत्र की लोकशाही यातून निवड सोनिया गांधी यांना करावी लागेल, असे शिवान तिवारी यांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारमधील निवडणुकीत कॉंग्रेसने आपल्या खराब कामगिरीमुळे राष्ट्रीय जनता दलाच्या तोंडातील सत्तेचा घास हिरावून घेतला. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राहूल गांधी सिमल्यात पर्यटन करत होते. यावरून चिडलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याने सोनिया गांधी यांना सल्ला दिला आहे. पुत्र की लोकशाही यातून निवड सोनिया गांधी यांना करावी लागेल, असे शिवान तिवारी यांनी म्हटले आहे.
Sonia Gandhi will have to choose between son and democracy
शिवान तिवारी हे बिहारच्या विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे नेते आहेत. आरोग्य ठीक नसतानाही सोनिया गांधी अध्यक्ष म्हणून ज्या प्रकारे पक्ष चालवत आहेत, हे पाहून मी त्यांचा आदर करतो, असे सांगून तिवारी म्हणाले, काँग्रेसची स्थिती नावाडी नसलेल्या नावेसारखी झाली आहे, कोणीच त्याचा वाली उरलेला नाही. राहुल गांधी यांच्यामध्ये लोकांना उत्साहित करण्याची क्षमता नाही हे स्पष्ट झालेले आहे. जनतेची गोष्ट तर सोडूनच द्या, पण त्यांच्याच पक्षातील लोकांचाच त्यांच्यावर विश्वास नाही. याच कारणामुळे लोक काँग्रेसपासून दूर जात आहेत.
आरोग्य ठीक नसतानाही सोनिया गांधी यांनी अध्यक्ष म्हणून पक्ष चालवत आहेत. मी त्यांचा आदर करतो. मला आठवते की सीताराम केसरी यांच्या काळात पक्ष रसातळाला जात असताना त्यांनी काँग्रेसची जबाबदारी सांभाळली आणि पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचविले, मात्र त्या विदेशी असण्यावरून बराच वाद झाला. आज सोनिया गांधी यांच्यापुढे यक्ष प्रश्न आहे की पक्ष की मुलगा किंवा असे म्हणू शकतो की पुत्र की लोकशाही. काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक होत आहे. माझे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचेल की नाही हे मला माहीत नाही, मात्र देशापुढे आज ज्या प्रकारचे संकट दिसत आहे, तेच मला माझे म्हणणे पुढे मांडण्यासाठी हतबल करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App