विशेष प्रतिनिधी
सांगली : बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने, शर्यतींच्या बैलगाड्या (छकडा गाड्या) बनवण्याच्या व्यवसायाला उर्जितावस्था आली आहे.बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आल्यानंतर हा व्यवसाय अगदी मोडकळीस आला होता. या व्यवसायात काम करणाऱ्या लोकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती.Bullock cart race thrills in Sangli again: Demand for bullock cart
पण सर्वोच्च न्यायालयाने शर्यतींवरील बंदी उठवल्यानंतर बैलगाडयांना मोठी मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर बैलगाडा शर्यती सुरू होत आहेत. संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांची परवानगी घेऊन राज्यातील बैलगाडी सुरू होत आहे.
जिल्ह्याधिकारी यांच्या कडून नियम अटी पाळून ही शर्यत घेण्यासाठी परवानगी दिली जात आहेत. या शर्यतीसाठी २६ नियम देण्यात आलेत. शर्यतींच्या बैलगाड्या बनवण्याच्या व्यवसायाला उर्जितावस्था आली आहे.
https://youtu.be/Po5h1qAlVmY
सांगली जिल्ह्यातील रांजणी गावात शर्यतींच्या बैलगाड्या बनवल्या जातात. सिद्धनाथ देसाई यांचा शर्यतींच्या बैलगाड्या बनवण्याच्या कारखाना आहे. तीन पिढ्यापासून देसाई कुटुंबीय बैलगाड्या बनवतात. शर्यत शौकीन पुन्हा नव्याने या छकडा गाड्या बनवून घेत आहेत.
आता अगदी दिवसाला चार छकड्यांच्या ऑर्डर्स मिळत आहेत. हलक्या वजनाच्या , बैलाला शर्यतीत पळताना बिल्कुल ओझे न होणाऱ्या अशा गाड्या लागतात . अशा गाड्या बनवणारे एकमेव उत्पादक सांगली जिल्ह्यातील रंजणी गावातील सिद्धेश देसाई आहेत.
बैलगाडी शर्यत सुरू झाल्यामुळे एकीकडे शर्यत शौकिनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे बैल गाड्या बनवणाऱ्या कारागिरांचे सुद्धा पुन्हा काम उपलब्ध झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App