वृत्तसंस्था
कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आजच्या बंगाल दौऱ्यात स्वातंत्र्यसैनिक क्रांतिकारक खुदिराम बोस यांना श्रध्दांजली अर्पित केली. पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. मुख्य म्हणजे खुदिराम बोस यांच्या वंशजांना ते भेटले आणि त्यांचा सत्कार केला. khudiram bose family honoured by amit shah in west bengal
अमित शहांच्या हस्ते सत्काराने बोस परिवाराचे सदस्य भारावून गेले. आतापर्यंत आमची कोणी दखल घेतली नव्हती. भाजपने आमचा सन्मान तरी केला. राज्यात तृणमूळ काँग्रेसपासून सगळ्या पक्षांची सरकारे येऊन गेली पण आमच्याकडे कोणी पाहिले नाही, अशा भावना खुदिराम बोस यांच्या कुटुंबातील सदस्य गोपाल बसू यांनी व्यक्त केल्या. khudiram bose family honoured by amit shah in west bengal
खुदिराम बोस यांच्या गावाचा विकास आणि युवकांना रोजगार देण्याची मागणीही अमित शहा यांच्याकडे केल्याचे गोपाल बसू यांनी सांगितले. अमित शहांनी त्यांना भारत सरकारच्या वतीने सन्मानपत्र प्रदान केले. यावेळी गोपाल बसू यांच्या समवेत अन्य कुटुंबीय देखील उपस्थित होते.
खुदिराम बोस यांची स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरी
देशावर लाल – बाल – पाल यांचा प्रभाव असताना खुदिराम बोस सशस्त्र क्रांतिकारकांच्या गटात कार्यरत होते. वंगभंग विरोधी आंदोलनात उतरेल्या स्वातंत्र्यसैनिकांना कठोर शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीश किंग्जफोर्डच्या गाडीवर बॉम्बफेक करून त्याला मारण्याच्या कटात खुदिराम बोस यांना १९०८ फाशी देण्यात आले. त्यावेळी किंग्जफोर्डच्या गाडीवर बॉम्ब पडण्याऐवजी दुसऱ्या गाडीवर बॉम्ब पडला आणि दोन इंग्रज महिला ठार झाल्या.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यातील तो पहिला बॉम्बस्फोट होता. त्यावेळी बॉम्बगोळ्याचा अर्थ या शीर्षकाचा अग्रलेख टिळकांनी केसरीत लिहिला. त्याची भाषा अतिशय जहाल होती. त्याबद्दल टिळकांना तिसऱ्या राजद्रोहाच्या खटल्याला सामोरे जावे लागून मंडलेच्या कारावासाची शिक्षाही झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App