२३५ पैकी ६८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या करोनाबाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.Mumbai: 68 employees in CBI office tested positive, home quarantined
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत करोना विषाणूने चांगलाच हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढतच आहे.दरम्यान सीबीआयच्या मुंबई कार्यालयात शनिवारी करोनाचा स्फोट झाला.सीबीआयचे कार्यालय मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे.तब्बल ६८ कार्यालयीन कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कार्यालयात काम करणाऱ्या २३५ लोकांची कोरोना चाचणी करण्यास सांगितले होते. २३५ पैकी ६८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या करोनाबाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईत करोना बाधितांच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.याआधी शुक्रवारी एकाच दिवसात मुंबई पोलिसांच्या किमान ९३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App