विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात १० जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा बुस्टर डोस दिला जाणार आहे. मात्र, त्यासाठी दुसरा डोस घेउन नऊ महिने किंवा ३६ आठवडे उलटलेले असणे आवश्यक आहे. या निकषानुसार, साधारणत: फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये ज्यांनी दुसरा डोस घेतला, ते सध्या पात्र ठरू शकतील.Senior citizen will get a booster dose of corona from January 10, but after nine months of second dose
त्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर कोविनच्या माध्यमातून मेसेजही पाठविण्यात येणार आहे.बुस्टर डोससाठी केंद्राने काही सूचना दिल्या आहेत. दक्षता मात्रा घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांना कोविन पोर्टलवर नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही.
कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन त्यांना दक्षता मात्रा घेता येईल, असे केंद्राने म्हटले आहे. आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे इतर आजार असलेल्या ज्येष्ठांना दक्षता मात्रा घेता येणार आहे. त्यासाठी ८ जानेवारीपासून कोविनवर बुस्टर डोस घेण्यासाठी स्लॉट बुक करता येईल.
तसेच ऑफलाईन म्हणजेच थेट लसीकरण केंद्रावर जाऊनदेखील लस घेता येणार आहे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांनाच बुस्ट देण्यात येणार आहे. इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना तिसऱ्या डोससाठी डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची गरज राहणार नाही. हा डोस मोफत देण्यात येणार आहे.
मात्र, खासगी रुग्णालयात पैसे देऊन डोस घ्यायचा आहे, ते शुल्क भरून डोस घेऊ शकतात. ज्यांना नुकताच कोरोनाचा संसर्ग झाला आहे, अशा लाभार्थ्यांना दक्षता मात्रा घेण्यासाठी तीन महिने थांबावे लागणार आहे. ज्यांनी कोविशिल्ड घेतली त्यांना याच लसीचा तर ज्यांनी कोव्हॅक्सिन घेतली त्यांना कोव्हॅक्सिनचाच बुस्टर डोस देण्यता येईल,
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App