२०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, तसेच ४९ शिक्षकांची निवड करून पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार आहे. Nashik: Maharashtra University of Health Sciences and the state government will start a post graduate medical college; Information given by Guardian Minister Chhagan Bhujbal
विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था सुरू करण्यासाठी त्यात, बालरोग, जनरल मेडिसिन, स्त्रीरोग व प्रसूती, भूल वैद्यक, आपत्कालीन वैद्यक यांसह साधारण सात विषयांच्या एमडी, एमएस अभ्यासक्रमांना परवानगी मिळाली असून, त्यासाठी प्रवेश दिले जातील.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, तसेच ४९ शिक्षकांची निवड करून पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची महिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.कोरोना आढावा बैठकीनंतर श्री. भुजबळ पत्रकारांशी बोलत होते.म्हणाले, की राज्य शासन आणि आरोग्य विद्यापीठ यांच्यात ६० : ४० अशा आर्थिक जबाबदारीतून हे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत होईल.
दरम्यान महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे इमारतीच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव पाठविला आहे.तसेच महिनाभरात प्रक्रियेला गती येऊन बांधकाम सुरू होईल, असे नियोजन आहे. साधारण ६७० कोटींचा वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App