आत्तापर्यंत राजकीय मतभेद वैयक्तिक तोफा डागणे, एकमेकांच्या पक्ष नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर हल्ले करणे वगैरे पर्यंत मर्यादित होते. परंतु पंजाब मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळली आणि आणि सुरक्षा व्यवस्थेचे गंभीर उल्लंघन झाले यातून एक बाब स्पष्ट होते आहे, देशात आता राष्ट्रीय पातळीवरच्या अति उच्च पदांवर असणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षाव्यवस्थेची राजकीय दृष्टिकोनातून “खिलवाड” सुरू झाला आहे.Bengal and Punjab pattern of violation of security arrangements of superiors
गोष्ट फार जुनी नाही. सहा – आठ महिन्यांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हल्ले केले होते. त्यावेळी पश्चिम बंगालचे पोलीस बघ्याची भूमिका घेऊन उभे असल्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील हा राजकीय संघर्ष आहे, अशी मखलाशी प्रसार माध्यमांनी देखील केली होती. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी “नड्डा – फड्डा – कड्डा” अशी अश्लाघ्य भाषा वापरत त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी आपण किती बेफिकीर आहोत हे दाखवून दिले होते पण कितीही झाले तरी बंगालमधला सुरक्षाविषयक बेफिकिरीचा पॅटर्न हा राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संबंधित होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या अति उच्च पदस्थ नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत त्यावेळी फार मोठी त्रुटी आढळली नव्हती.
पंजाब मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शेतकरी आंदोलनानंतरचा आज पहिला कार्यक्रम होता. तेथे सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळणे आणि सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. राजकारणाच्या चष्मा लावून बघण्याच्या पलिकडे जाऊन दखल घेण्याची ही बाब आहे. नुसत्या राजकीय आरोप-प्रत्यारोपातून या प्रश्नाला उत्तर मिळणार नाही. केवळ पंजाबमध्ये विरोधी पक्षाचे सरकार आहे म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही किंवा त्यावर फक्त टीका करून भागणार नाही.
लोकशाही प्रक्रियेत राजकीय मतभेद राहणार सत्ता आलटून पालटून येत आणि जात राहणार. म्हणून पंतप्रधानांच्या सारख्या उच्चपदस्थ नेत्याच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवणे किंवा सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन करणे ही बाब कोणत्याही राजकीय मतभेदांच्या पलिकडची आणि अत्यंत गंभीर आहे.
सुरक्षाव्यवस्थेचा बंगाल पॅटर्न तिथल्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या नेत्यांभोवती कसा केंद्रित झाला होता हे आपण पाहिले आहे. पण पंतप्रधानपदासारख्या अतिउच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या सुरक्षाव्यवस्थेत गंभीर त्रुटी ठेवण्याचा हा पंजाब पॅटर्न अधिक धोकादायक आहे. याकडे राजकीय चष्म्याच्या पलिकडे जाऊन बघण्याची गरज आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App