विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चक्क प्रयोगशाळेत केवळ हवेच्या साह्याने बनवली प्रथिने

अन्नधान्य उत्पादनाची सध्याची पद्धती जैवविविधतेला नुकसानदायक झाली आहे. अनेक वन्यजीव व वनस्पती त्यामुळे विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. जलवायुपरिवर्तन हेही त्याचे एक कारण आहे. त्यामुळे आता पुन्हा सेंद्रिय पद्धतीकडे वळण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. परंतु, त्याची अंमलबजावणी फारशी होताना दिसत नाही. त्यामुळे प्रयोगशाळेतील किंवा कारखान्यात तयार केलेले अन्नपदार्थ हा लोकांची गरज पूर्ण करण्यासाठी पर्याय ठरू शकतो. आता फिलनंडमधील शास्त्रज्ञांनी केवळ हवेच्या साह्याने प्रथिने प्रयोगशाळेत तयार करण्यात यश मिळविले आहे.In chucky laboratories only proteins made with the help of air

अशा पद्धतीने तयार केलेली प्रथिने येत्या दशकभरात खऱ्याखुऱ्या सोयाबीनची जागा घेऊ शकतील. प्रामुख्याने वनस्पतींमध्ये जी प्रथिने तयार होतात, ती जिवाणूंच्या प्रक्रियेमुळे. ऊर्जेच्या साह्याने पाण्यातील हायड्रोजन अणू वेगळा होतो व त्याच्या साह्याने मातीतील जिवाणू प्रथिने तयार करतात. सौर आणि पवनऊर्जेद्वारे विद्युतनिर्मिती केली जाऊ शकते, तर कोणत्याही हरितगृहवायूचे उत्सर्जन न होताही त्या ऊर्जेपासून अन्न तयार करता येऊ शकेल, या संकल्पनेतून शास्त्रज्ञांनी काम सुरू केले आहे.

त्यांचे हे प्रयोग यशस्वी झाले, तर शेतीशी संबंधित अनेक अडचणींवर मात करणे शक्य होईल. हेलसिंकी सोलर फूड प्लांटमध्ये याबाबतचे संशोधन सुरू आहे. येथील प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या प्रथिनयुक्त पिठाला ज्याला सॉलेन असेही म्हटले जाते कोणतीची विशिष्ट चव नाही. कोणत्याही चवीशिवाय प्रथिने बनविण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. आइस्क्रीम, बिस्कीट, पास्ता, नूडल्स, सॉस किंवा ब्रेड यांच्यावर प्रक्रिया करून पाम तेलासारखा पदार्थ तयार केला जाऊ शकतो. चांगल्या प्रतीचे मांस तयार करण्यासाठी या प्रक्रियेचा वापर केला जाऊ शकतो,

असे संशोधकांचे म्हणणे आहे. संशोधनाचे मूलभूत काम 2023 पर्यंत पूर्ण होईल आणि 2025 पासून प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊ शकेल. सॉलेन तयार करण्यासाठी विद्युतविघटनाद्वारे पाण्यातील हायड्रोजन वेगळा काढला जातो. हायड्रोजन तसेच हवेतून घेण्यात आलेला कार्बन डायऑक्साइड आणि खनिज पदार्थ जिवाणूंना दिले जातात, नंतर त्याचे रूपांतर प्रथिनांमध्ये होते. प्राण्यांपासून मिळाणाऱ्या प्रथिनांपेक्षा कारखान्यात तयार केलेली प्रथिने 2035 पर्यंत दहापटींनी स्वस्त असतील, असा होरा आहे.

In chucky laboratories only proteins made with the help of air

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात