अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टच्या परवानग्या मागे घेण्याची स्वदेशी जागरण मंचाची सरकारकडे मागणी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – पांचजन्य’ या नियतकालिकाने अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट या बहुराष्ट्रीय कंपन्यांवर टीकेची झोड उठविली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित स्वदेशी जागरण मंचानेही या कंपन्यांना भारतात उद्योग आणि व्यवसायासाठी देण्यात आलेल्या परवानग्या मागे घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. Ban on Amezon says Swadeshi jagran manch


अ‍ॅमेझॉन नाही ही तर गांजा कंपनी, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा आरोप


या दोन्ही कंपन्यांना भारतामध्ये उद्योग आणि व्यवसायासाठी देण्यात आलेल्या परवानग्या तातडीने मागे घ्याव्यात तसेच त्यांचे सगळे व्यवहार बेकायदा घोषित करण्यात यावेत. या दोन्ही कंपन्यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

मंचने केलेल्या ठरावामध्ये म्हटले आहे की, ‘‘ या दोन्ही कंपन्यांकडून सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या लाभ पोचविले जात असून याची निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर त्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे तसेच त्यांना कठोर शिक्षा देखील ठोठावली जावी.’’

Ban on Amezon says Swadeshi jagran manch

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात