प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या किसान रेलची खेप आज जालन्यातून आसामकडे रवाना झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी या किसान रेलला हिरवा झेंडा दाखविला. या किसान रेलमध्ये 350 टन कांदा आहे.Kisan Rail has benefited farmers. Indian Railways is committed for the transportation of agriculture produce by Kisan Rail.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी @narendramodi यांनी प्रारंभ केलेल्या अनेक उपक्रमांपैकी ‘किसान रेल‘ हा एक उपक्रम.आज जालना येथून किसान रेलचा प्रारंभ झाला. ही किसान रेल आसाममध्ये जाईल. #KisanRail @AshwiniVaishnaw @raosahebdanve https://t.co/noCLqwcikz — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 2, 2022
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी @narendramodi यांनी प्रारंभ केलेल्या अनेक उपक्रमांपैकी ‘किसान रेल‘ हा एक उपक्रम.आज जालना येथून किसान रेलचा प्रारंभ झाला. ही किसान रेल आसाममध्ये जाईल. #KisanRail @AshwiniVaishnaw @raosahebdanve https://t.co/noCLqwcikz
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 2, 2022
देशभरात आतापर्यंत किसान रेलच्या 1650 फेऱ्या झाल्या असून त्यापैकी 75 % किसान रेल महाराष्ट्रातून धावल्या आहेत. एकूण तब्बल 6 लाख टन शेतमालाची वाहतूक या सर्व किसान रेलने केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून किसान ट्रेन संदर्भातही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांची ट्विट अशी :
– शेतमालाची देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात वाहतूक यामुळे सोपी होते. त्यामुळे भाजीपाला, फळे याची देशात जेथे जी मागणी आहे, तेथे त्याचा पुरवठा करता येतो. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला बाजारपेठ सहज उपलब्ध होते. सुमारे 6 लाख टन शेतमालाची वाहतूक किसान रेलने आतापर्यंत केली आहे.
– मला येथे हे आवर्जून सांगितले पाहिजे की, आतापर्यंत ज्या सुमारे 1650 किसान रेल चालल्या, त्यापैकी 75 टक्के या महाराष्ट्रातून धावल्या. पहिल्या ‘किसान रेल’चा बहुमान सुद्धा महाराष्ट्रालाच मिळाला होता.
– शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रारंभ केलेल्या अनेक उपक्रमांपैकी ‘किसान रेल‘ हा एक उपक्रम. आज जालना येथून किसान रेलचा प्रारंभ झाला. ही किसान रेल आसाममध्ये जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App